Yesaji Kank Mobile
Yesaji Kank Name
Information Scroll
Sun

येसाजी कंकांबद्दल माहिती

येसाजींचे नाव ऐकताच येसाजींनी तलवार उगारली, क्षणभर पातं चमकलं, दुसऱ्याच क्षणी सोंडेवर वार करून येसाजी बाजूला झाले. वारामध्ये हत्तीची सोंड कापली गेली होती-श्रीमान योगी कादंबरीमध्ये उल्लेख असलेला, कुतुबशहाच्या दरबारात घडलेला हा प्रसंग आपल्या नजरेसमोर उभा राहतो!

येसाजी कंक यांचा जन्म इ.स. १६२६ मध्ये भुतोंडे गावात, राजगडाच्या पायथ्याशी झाला होता. येसाजी हे शारीरिक दृष्ट्या सशक्त आणि बलदंड शरीरयष्टीचे होते.

छत्रपती शिवरायांनी इ.स. १६४५ साली रायरेश्वरी घेतलेल्या स्वराज्य शपथेपासून ते इ.स. १६८९१६९० साली छ.संभाजी महाराजांनंतर छ.राजाराम महाराजांच्या कार्यकाळात ज्येष्ठ सल्लागार म्हणून येसाजींचा उल्लेख आहे.

स्वराज्यसेवेमध्ये सलग ३० वर्ष पायदळाचे सरनोबत पद भूषवताना फक्त २० वेळा आपल्या निवास्थानी जात स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण येसाजी कंक यांनी दाखवून दिले.

स्वामिनिष्ठ, स्वराज्यभक्ती आणि स्वराज्यसेवेचे धगधगते स्फुलिंग सरनोबत येसाजी कंक यांना मानाचा मुजरा !!!