कंक घराणे
कंक घराणे

माहिती

background

कंक घराणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि वीर घराणे आहे. ज्याचा इतिहास प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी आणि स्वराज्यस्थापनेशी जोडलेला आहे.

महाभारतामध्ये पांडवांना १२ वर्षांचा वनवास व वर्षाचा अज्ञातवास होता. या अज्ञातवासामध्ये युधिष्ठिराने विराट राजाच्या पदरी सेवा करत असताना 'कंक' हे उपनाव धारण केले. साताऱ्याजवळील वाई येथील वैराटगडच्या भागातील वैराट समाजावर पांडवांनी विजय मिळवला व हे सर्व पांडवांचे अनुयायी झाल्याने त्यांनीही 'कंक' हे आडनाव धारण केले.

historic
roperope
background
historic

१६०० व्या शतकात महाराष्ट्रातील सह्याद्री नावाच्या कुरुक्षेत्रावर छ.शिवाजी महाराजांच्या रुपी कृष्ण अवतरले. अन्याय, अधर्म आणि असत्याविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या कृष्णाला 'येसाजी कंक' नावाच्या युधिष्ठिराची साथ लाभली.

स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी योद्धे सरनोबत येसाजी यांचा जन्म इ.स. १६२६ साली भोर जवळील भुतोंडे गावी कंक घराण्यात झाला.

roperope
background

पिळदार शरीरयष्टीचे व बलशाली बाहूंचे येसाजी कंक हे छ.शिवाजी महाराजांच्या बालपणीचे सवगंडी होते १६४५ साली रायरेश्वर येथे छ.शिवाजी महाराजांनी येसाजी कंक आणि काही मोजक्या मावळ्यांसह स्वराज्याची शप्पथ घेतली. (इ.स. १६४५)

स्वराज्यात पहिला गड 'तोरणा' घेण्यापासनू ते १६९० साली छ.राजाराम महाराजांच्या कार्यकाळात जेष्ठ सल्लागार म्हणनू येसाजींनी प्रत्येक मोहीम व योजना साहसी आणि नीतिमानाने लढले.

छ.शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जवळपास सर्व महत्वपूर्ण घटनांमध्ये येसाजी कंकांचा सहभाग आढळतो. अफझलखान वध, लाल महाल प्रंसग , आग्रा भेट, दक्षिण दिग्विजय तसेच फोंडा किल्ला युद्धात वयाच्या ५० व्या वर्षी हाती समशेर पोर्तुगीजांशी लढा देणारे येसाजी कंक साहस, अढळ, स्वाभिमान आणि स्वामिनिष्ठ यांचे सर्वोच्च उदाहरण ठरतात.

'स्वराज्य हेच सर्वस्व' मानून स्वराज्यसेवेच्या ३० वर्षात येसाजी कंक फक्त २० वेळा आपल्या निवासस्थानी गेले.

historic