name
card
trust

वाड्याची माहिती

home

स्वराज्याचे सरसेनापती आणि छ.शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी येसाजी कंक यांचे गाव भुतोंडे पुण्यातील

भोर मधील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले गाव.

आज ही ह्या वाड्यात पाऊल ठेवल्यावर वेळ थांबते आणि इतिहास आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा

राहतो.

इतिहास संकलक श्री. आप्पा परब म्हणतात,

“भू म्हणजे भूमी आणि तोंड म्हणजे मुख्य.

भुतोंडे म्हणजेच राजगड जिल्ह्याच्या जवळपासच्या गावातील मुख्य गाव

yesaji

येसाजी कंक वाडा पुण्यापासून ६५ किमी, भोरपासून ५५ किमी तर साताऱ्यापासून ११० किमीवर आहे.

छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, छ. शाहूमहाराज आणि छ.राजाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन

झालेल्या कंक वाड्यात आज ही येसाजी कंकांचे १२वे, १३वे, आणि १४वे वंशज राहतात.

इतिहासाचा पुरावा देणारा हा वाडा गेल्या अनेक दशकांतील बदलांचा साक्षीदार आहे.

वाड्याच्या अंगणात तुळसी वृंदावन आहे. आतमध्ये वाडा सागवानी तुळईंवर उभा आहे. मुख्य दारातून प्रवेश

करताच आत ओसरी आहे. ओसरीच्या उजव्या बाजूस सरसेनापती येसाजी कंक यांचा पुतळा आहे. त्या लगत काही

पुरातन हत्यारे जसे तलवार, धोप, खंजीर, बंदूक तसेच शिवकालीन नाणी बघायला मिळतात. दोन मजली वाड्यात

वरच्या बाजूस माडीवर जुनी भांडी आहेत. वाड्यामध्ये आत चौक आहे.

भव्य कंक वाडा इतिहासाच्या प्रत्येक पानाची साक्ष देतो.

pot

प्रत्येक खिडकीतून राजगडचा बालेकिल्ला आणि संजीवनी माची दिसणाऱ्या या वाड्यात आज हि येसाजी कंकांचे

वंशज इतिहास जपताना दिसतात. येणाऱ्या प्रत्येकाला ते वाड्याची, इतिहासाची संपूर्ण माहिती देतात.

इतिहासाचा हा अनमोल ठेवा सर्वांसाठी नेहमी खुला असतो. आजही कंक वाडा येथे अनेक शिवभक्त, इतिहास

अभ्यासक, मावळे रोज भेट देण्यास येतात.